आपल्याला लहानपणापासून आपले पालक आपले गुरु नेहमी सांगत आले आहेत कि लवकर निजे लवकर उठे तिथे लक्ष्मी वसे, परंतु आजकाल लोकांमध्ये रात्री काम करण्याची पद्धत रुजू होत आहे. त्यामुळे एकतर ते सकाळी उशिरापर्यंत झोपून राहतात नाहीतर त्यांची झोप पूर्ण होत नाही. झोप हि निरोगी शरीरासाठी खूप महत्वाची आहे. शारीरिक वाढ, जखमा शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी तसेच आवश्यक ती संप्रेरके शरीरामध्ये योग्य प्रमाणात तयार होवून त्याचा योग्य वापर होण्यासाठी झोप महत्वाची आहे. परंतु झोप पूर्ण न झाल्याने शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. निद्रावस्थेत शरीरात रोगप्रतीकारक शक्ती वाढवणारे सायटोकिन्स आणि संसर्गजन्य रोगांशी लढणाऱ्या अँटीबॉडीज तयार होतात. झोप न झाल्याने या सगळ्या क्रिया बंद होतात. माणूस वारंवार आजारी पडतो आणि लवकर बरा होत नाही. म्हणून आजारी व्यक्तीला डॉक्टर जास्तीतजास्त झोप घेण्याचा सल्ला देतात.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews